Adsense

Sunday, May 3, 2020

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता
नजर थरारून जाते
पाणी पापणी दाटूनी
काळीज उभे चिरते


 फोटोकडे तिच्या पाहता
अंगी स्पर्श जाणवतो
जो तिने केला होता
जेव्हा मी इवलुसा होतो

फोटोकडे तिच्या पाहता
नजर नजरी रुतली
अवघ्या जगी धूंडळूनी
नाही पुन्हा गवसली

फोटोकडे तिच्या पाहता
माझे डोळे पाणावले
अंग शहारले आठवून
तिने कुशीत घेतलेले

हाती धरूनिया तू
मला चालविले
तोल जाताना पाहून
पुढे हात सरसावले

खरचटलेले मला पाहून
त्यावर हळूच फुंकर मारली
छातीशी धरून कुरवाळून
गोड  पापी हो घेतली

काय सांगू आई त्या पापीची
किंमत आज मजला कळते
फोटोकडे पाहताना तुझ्या
रोज डोळा पाणी हो दाटते

काय काय करायचं पुढे
तुझ्यासह म्हणत होतो
गाडी घेऊ घर बांधू
स्वप्ने उगा पाहत होतो

म्हणत होतीस माझा
राजा सार हो करेल
एका शब्दावर तुझ्या
मी होत विश्व जिंकल

पण तू गेलीस अन्
जीवनाचा सारा डाव विस्कटला
वीज पडली जणू अंगावर
राजा तुझा पुरता कोलमडला

आजही जगापुढे
मी हसत सदा असतो
हृदयाच्या कोपऱ्यात एका
मात्र ढसाढसा रडतो

जग कोरडे वाटते
परकी वाटतात नाती
कुशी नसते आईची आता
भयाण वाटतात राती

स्वर्ग नको सुख नको
एकच विचारतो तुझा तान्हा
भातुकलीचा घास भरवायला
आई पुन्हा येशील ना.....
             - राधेश्याम सुभेदार
©राधेश्याम सुभेदार 9767291508

Friday, May 1, 2020

माणसातला सैतान

एक गाढव झाडाला बांधलेले होते.

सैतान आला आणि त्याने ते गाढव सोडून दिले.

ते गाढव शेतात घुसले आणि उभ्या पिकाची नासधूस करू लागले.

शेतकऱ्याच्या बायकोने हे पाहिले आणि बंदुकीच्या गोळीने गाढव ठार केले.

गाढवाच्या मालकाला हे सहन झाले नाही,त्याने शेतकऱ्याच्या बायकोला ठार केले.

इकडे शेतकरी घरी आला.बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून संतापला आणि त्याने गाढवाच्या मालकाला ठार मारले.

गाढवाच्या मालकाच्या बायकोने आपल्या मुलांना आदेश दिला की,शेतकऱ्याचे घर पेटवून द्या.

त्या संध्याकाळी तिच्या दोन मुलांनी शेतकऱ्याचे घर पेटवून दिले आणि शेतकरी त्यात जळून खाक झाला असेल,या आनंदात घरी आले.

परंतु त्या आगीतून शेतकरी वाचला,तो परत आला आणि त्याने गाढवाच्या मालकाची बायको आणि दोन मुले ठार केली.

पाश्चातापाने शेतकऱ्याने सैतानाला विचारले की हे सगळे असे का घडले ?

त्यावर सैतान म्हणाला की, *"मी काहीच केले नाही,मी तर फक्त गाढवाला मुक्त केले होते.तुम्ही त्यावर क्रिया-प्रतिक्रिया करत बसला आणि आपल्यातल्या सैतानाला मुक्त केले."*



*त्यामुळे इथून पुढे उत्तर देताना,प्रतिक्रिया व्यक्त करताना,बातमी देताना,धिक्कार करताना,सुड व बदला घेताना* थांबा आणि विचार करा.

काळजी घ्या...
बऱ्याच वेळा सैतान काय करतो..काहीच करत नाही, तो फक्त आपल्यातील *गाढवाला मुक्त* करत असतो.

Monday, April 27, 2020

शिवधनुष्य


शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले. त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला,

"शिवधनुष्य कुणी मोडलं..?"
मुलगा घाबरून म्हणाला, "मी नाही मोडलं.."
👶👶👦👦
साहेब चकित झाले.. 

त्यांनी गुरुजींना विचारले,
"असं काय म्हणतो हा मुलगा..?"

गुरुजी म्हणाले,
"परिस्थितीने गरीब आहे बिचारा, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही."

साहेब तरातरा हेड मास्तरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले,
"मी 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' असं विचारलं, तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की 'मी नाही मोडलं' गुरुजी म्हणतात की 'मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही.' हा काय प्रकार आहे..?"

हेडमास्तरांना प्रचंड राग आला..

ते म्हणाले,
"कोण नाही म्हणतो..? छडी घेऊन गेलो ना की सगळे कबूल करतील 'मीच मोडलं' म्हणून..!"

प्रकरण गेले शिक्षणमंत्र्यापर्यंत..

शिक्षणमंत्री म्हणाले,👴
"हे पहा, आता मोडलंच आहे ना धनुष्य..? मग गप्प बसा. आधीच खूप गोष्टी अंगाशी आल्या आहेत, त्यात ही एक नको. येत्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको..!"

साहेब हताश होऊन घरी आले..👨👨

बायकोला म्हणाले,

"मी एक प्रश्न विचारला, 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती..?"

बायको म्हणाली,👩👩
"हे बघा, सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते..? तुमचं हे नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं...!"

Wednesday, April 8, 2020

लॉकडाऊन

-- लॉकडाऊन असून देखील बारामतीकर निर्धार रस्त्यावर फिरत आहेत, जरा लाजा धरा..लाजा...६ ची संख्या तुम्हाला ६० करायची आहे का ? -- 

बारामती कोरोनाग्रस्त करण्याचा विचार आहे का  तुमचा? पोलीस प्रशासन बोंबलून सांगत आहेत घरात बसा तर काही 
विकृत लोक सतत बाहेर फिरताना दिसत आहेत..उद्या तुमच्यामुळे तुमचे कटुंबावर मोठं संकट येऊ शकत याचा थोडा तरी विचार केलाय का तुम्ही ?
हा कोरोना नावाचा व्हायरस म्हणजे साधासुधा वाटला काय तुम्हाला ! या रोगावर अजून अमेरिकेला सुद्धा औषध सापडलं नाही 
विचार करा मग ... भाजीविक्रेत्याचं तरी उदाहरण घ्या.. तो ४ महिने कुठेच गेला नव्हता..तो पॉझिटिव्ह झाला आणि दुसऱ्या दिवशी 
त्याच्या मुलाला आणि सुन पॉझिटीव्ह निघाली...आज त्याच्या दोनी नातीला सुद्धा कोरोना झाला ... विचार करा एका माणसामुळे 
कुटुंबाला भोगावं लागतं आहे ना हे .. म्हणून आम्ही तुम्हाला तळमळीने सांगतोय त्याचा तरी विचार करा ... 
तुमच्या कुटुंबाचा विचार करून तरी घरात बसा कि.... तुम्ही सुशिक्षित आहात जास्त सांगायची गरज नाही. 
विचार करण्याची गोष्ट आहे... हे संकट जगात आलाय आता ते आपल्या घरात सुद्धा आलंय हो ...अरे  या रोगाने जगात ८० हजार माणसं मेलीत रे..
अमेरिका,स्पेन , आणि इटली मधली परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलीये कि तिथं दररोज ८०० लोकं मरतायेत किती ८०० ... आत्तापर्यंत 
अमेरिकेत 13,027, स्पेन मध्ये १४,९५८ आणि इटली मध्ये 17,669 एवढी माणसं मेली आहेत मेली !!! विचार करा किती भयंकर आहे
अरे बघता बघता आपल्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त  १०००+ झालेत ... म्हणून सांगतोय तुम्ही बेजबाबदार वागू नका ... पुढचे काही 
दिवस घरातच थांबण्याशिवाय पर्यायच नाही .... नाहीतर आपला महाराष्ट्र अमेरिका स्पेन इटली होण्यास वेळ लागणार नाही ... 
इथे तर दररोज १००+ नवे रुग्ण सापडत आहेत ... विचार करा आतातरी ... 
.. 
ते रात्रंदिवस पोलीस बिचारे रस्त्यावर उभे आहेत ते त्यांचं काम करतायेत तुम्ही बाहेर निघून कशाला त्यांच्यावर अजून लोड टाकत आहात ?
कशाला त्यांना त्रास देत आहात ... एकदाचा किराणा भाजीपाला मेडिकल घेऊन ठेवा ना ... शेवटची हात जोडून विनंती आहे 
ह्या रोगाला आतातरी गंभीर घ्या ... बाहेर बोंबलत फिरण्याचे हे दिवस नाहीत ... जरा भानावर या शेठ आतातरी ... 
आता तुम्हाला वाटेल हा व्हायरस आपल्यापर्यंत येत नाही ... तुम्ही रस्त्यावर फिरणार .. बाजारात जाणार किराणा आणणार ... 
तुम्ही कितीतरी लोकांच्या संपर्कात येताच ना ... म्हणून ऐका घरात बसा ... घरासारखं दुसरं कोणतंच सुरक्षित ठिकाण नाही रे .. 
तुम्ही आत्ता मौजमजा करा बाहेर निघा रस्त्यावर फिरा ... पण नंतर हे संकट स्वतःच्या अंगावर येईल ना  वेळ निघून गेलेली असेल 
=== हि पोस्ट जेवढं शक्य आहे तेवढी पसरावा  ===

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...