Adsense

Sunday, May 3, 2020

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता
नजर थरारून जाते
पाणी पापणी दाटूनी
काळीज उभे चिरते


 फोटोकडे तिच्या पाहता
अंगी स्पर्श जाणवतो
जो तिने केला होता
जेव्हा मी इवलुसा होतो

फोटोकडे तिच्या पाहता
नजर नजरी रुतली
अवघ्या जगी धूंडळूनी
नाही पुन्हा गवसली

फोटोकडे तिच्या पाहता
माझे डोळे पाणावले
अंग शहारले आठवून
तिने कुशीत घेतलेले

हाती धरूनिया तू
मला चालविले
तोल जाताना पाहून
पुढे हात सरसावले

खरचटलेले मला पाहून
त्यावर हळूच फुंकर मारली
छातीशी धरून कुरवाळून
गोड  पापी हो घेतली

काय सांगू आई त्या पापीची
किंमत आज मजला कळते
फोटोकडे पाहताना तुझ्या
रोज डोळा पाणी हो दाटते

काय काय करायचं पुढे
तुझ्यासह म्हणत होतो
गाडी घेऊ घर बांधू
स्वप्ने उगा पाहत होतो

म्हणत होतीस माझा
राजा सार हो करेल
एका शब्दावर तुझ्या
मी होत विश्व जिंकल

पण तू गेलीस अन्
जीवनाचा सारा डाव विस्कटला
वीज पडली जणू अंगावर
राजा तुझा पुरता कोलमडला

आजही जगापुढे
मी हसत सदा असतो
हृदयाच्या कोपऱ्यात एका
मात्र ढसाढसा रडतो

जग कोरडे वाटते
परकी वाटतात नाती
कुशी नसते आईची आता
भयाण वाटतात राती

स्वर्ग नको सुख नको
एकच विचारतो तुझा तान्हा
भातुकलीचा घास भरवायला
आई पुन्हा येशील ना.....
             - राधेश्याम सुभेदार
©राधेश्याम सुभेदार 9767291508

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...