Adsense

Saturday, February 1, 2020

भरकटलेला - एक कविता

कळत नाही का आलो जन्माला
कळत नाही कशासाठी जगतोय
माणसांनी बरबटलेल्या या
रंगीबेरंगी जगात का उगा भरकटतोय...



किती रंग विश्वाचे कोणाला जवळ करू हे कळेना
किती रूप जीवाचे कोणावर विश्वास ठेऊ हे कळेना
गर्दी बरोबर सरताना मी कोण हे समजेना
ह्या भल्या मोठ्या जगात इवल्याश्या माझ्या घराचा पत्ता काही सापडेना...

आज म्हणलं हे माझे तर उद्या ते परके होतात
दाटून आलेल्या आनंदाच्या भावना पुन्हा एकदा पोरक्या होतात
कोण माझं कोण परक हे काही उमजेना
माझ्याच भावविश्वात मला माझं स्थान सापडेना

डोळ्यात स्वप्नं खूप आहेत पण निराशा मनी दाटलेली
भीती नाही अपयशाची पण अस्वस्थता मनाशी खेटलेली
किं कर्तव्य मुढ अर्जुनाला कृष्ण एखादा भेटेल ना?
माझ्याच भावनांच्या गर्दीत वाट घराची सापडेल ना?......

                                  -Radheshaym Subhedar

1 comment:

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...