Adsense

Monday, March 23, 2020

लहान होत तेच बर होत....

*लहान होत तेच बर होत....*
लहान होत तेच बर होत,
ना कशाची काळजी,ना कशाची चिंता होती
बॅट- बॉल, विटी- दांडू हीच आमची दुनिया होती....🤗

ना मनात पाप,ना शिक्षणाचं ओझ    होत,
मोठ होऊन काय व्हायचंय हे तेव्हा कुणी ठरवल होत,😅
नेहमी वाटायचं मोठ व्हावं मोठ्यांसारख वागावं
पण आता कळतंय, लहान होत तेच बर होत....😔

वय वाढलं,ओझ वाढलं दबला खाली खांदा
दबलेल्या खांद्याखाली बालपणाचा पार चुराडा झाला,
मोठ होऊन जर अपेक्षा पूर्ण करण्याचं काम होत,
तर लहान होत तेच बर होत...😔

या धावपळीच्या जीवनात त्या आठवणी पुन्हा ताज्या होतायेत
जेव्हा आम्हाला काही काम नव्हतं🙃
आता वाटतंय *लहान होत तेच बर होत....* 😔
  - ओंकार वाघ(बारामती)







No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...