सकाळी सकाळी उठून जरा घराबाहेर पडून काय चाललंय बघूया म्हणून दार उघडलं तर काय आश्चर्य दारात छत्रपती शिवाजी महाराज उभे . त्यांनी माझ्यावर तलवार रोखली आणि म्हणाले खबरदार जर घराबाहेर पडलास तर शत्रू महाभयंकर आहे . सध्या फक्त गनिमी कावा . मी घाबरून महाराजांना मुजरा करून दार लावून घेतलं . रोगाच्या भयाने त्रस्त झालो अस्वस्थ झालो . तितक्यात बाबा आमटे आले माझ्याबाजूला . सोफ्यावर बसले . त्यांनी मायेने हाथ फिरवला आणि म्हणाले अरे रोगाला घाबरून काय होणार आहे . फक्त त्याला नीट जाणून घेता आलं म्हणजे मिळवलं . मला थोडं हायसं वाटलं . मी म्हटलं तुम्ही असायला हवे होतात बाबा आता . ते म्हणाले मी नसलो तरी माझ्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत कि डॉक्टर आणि सेवकाच्या रूपात . तू बिनधास्त रहा . फक्तं त्यांच्यावरचा भार वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या . असं म्हणून बाबा आमटे गुप्त झाले . आता २१ दिवस घरी बसून काय करायचं याचा मी विचार करत होतो तोच गाडगे महाराजांनी मला झाडू ने झोड झोडलं . म्हणाले अरे मी ओरडून ओरडून सांगितलं रे कचरा साफ करा मनाचा आणि परिसराचा .. केलीत ना घाण . आता निदान तू तुझ्या घरातला तरी कचरा काढ . बाहेरचा कचरा काढणारी माणसं राबतायत तुमच्या साठी तुम्ही कचरा केला नाहीत तरी पुष्कळ ..गुमान झाडू घेतली आणि कचरा काढायला लागलो . तितक्यात सावरकर आले म्हणाले आता कळलं कैद म्हणजे काय असते . पण घाबरू नकोस या कठीण काळात तू तुझ्यातल्या लेखणीला आणि विचारांना खतपाणी घाल .. २१ काय ५० दिवस पण सहज जातील . मी त्यांना विचारलं पण खाण्याचं काय तितक्यात गांधीजी आले म्हणाले गरजा कमी कर आवश्यक तेवढंच खा . आणि सावरकर गांधीजी एकत्र हसत हसत निघून गेले . मला कळलं नाही मग आम्ही का भांडतोय आजही यांच्या नावाने .मला कळलं हाच तो काळ शहाणं होण्याचा . मी खिडकीत जाऊन त्यांचे आभार मानावे म्हटलं तर . दाभोळकर खिडकीत उभे त्यांनी मला बंदुकीची गोळी काढून दाखवली म्हणाले हीच ती अविवेकाची गोळी . तू विवेक घालवून बसू नकोस विज्ञानावर विश्वास ठेव एक दिवस नकीच यातून मार्ग काढशील .
मी म्हटलं चला आता या एकवीस दिवसात यांच्या विचारांची सोबत मला नकीच साथ देईल …
महेंद्र तुकाराम कदम .
Adsense
Friday, March 27, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
फोटोकडे तिच्या पाहता
फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...
-
फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...
-
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. ...
-
शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले. त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला, "शिवधनुष्य कुणी मोडलं..?" मुलगा घाबरून म्हणाला, "मी नाही मोडल...
No comments:
Post a Comment