भयानक सिनेमा काढायला भाषा आणि काळाचे बंधन नसते. फार पूर्वी एक अमराठी फिल्म बघितली होती. ब्लॅक अँड व्हाईट आणि फुजिकलर यांच्यामधली कोणती तरी होती. त्यात एक लोकोत्तर सीन होता. त्यात ती जी काय, हिरोईन म्हणून भारदस्त नटी कामाला असते .तिच्यावर व्हिलनचा डोळा असतो. आणि मग एके दिवशी मनात रेपात्मक कारवाई करण्याचा अत्यंत दुष्ट विचार घेऊन तो त्याच्या टोळीसकट तिच्या पाठीमागे लागतो. आपली अब्रू जाऊ नये म्हणून ती हिरोईन यथाशक्ती धावत सुटते. हे पाच लोकही भरपूर रिळं शिल्लक असल्याने काही अंतर ठेवून हळू हळू धावत असतात. मग हिरोईन पळता पळता जंगलात शिरते. हे सुद्धा नाइलाजाने तिच्या पाठोपाठ जंगलात शिरतात. आणि एका दगडाला अडखळून हिरोईन धप्पकन पडते. रेप्या व्हिलनला भलताच आनंद होतो. तो मोठयाने हसतो. बाकीचेही हसतात. बाकीचे का हसतात ते कळले नाही. दुसर्याच्या सुखात सुख मानायची वृत्ती, असेच काहीसे असणार. मग रेप्याचा क्लोज दिसतो. त्याच्या डोळ्यातल्या वासना पार हनुवटीपर्यन्त आलेल्या असतात. तो गलिच्छ अभिनय बघून हिरोईन अजूनच घाबरते. मग स्वतःचे फोरआर्म जमिनीवर ठेवून ती हळूहळू विरुद्ध बाजूला सरकू लागते. [ देवदासमधील मार डाला गाण्यात माधुरीची अशी काहीशी स्टेप आहे. ] ती जमिनीवर पडल्यामुळे रेप्या वाकून वाकून पुढे येत असतो. आणि काय मौज सांगू महाराजा....हिरोईन एका वारुळाला धडकते. त्या वारुळातून एक नाग येतो. मग हिरोईन त्याला सगळी सिच्युएशन सांगते. नागालाही सिच्युएशनची ग्रॅविटी लक्षात येते. तो थोडा विचार करतो. [ असा शॉट आहे त्यात ] आणि मग तिला वाचवायचा निर्णय घेऊन तो त्या व्हिलनकडे एक दर्जेदार फूस्स टाकतो. म्हणजे आपला फणा त्याच्याकडे “बाबाजीका ठुल्लू” स्टाईल पुढे करतो. त्या फण्यामुळे रेप्या घाबरतो. मग त्याच्या साथीदारांनाही नाग एकेक फूस्स देतो. या नागड्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही, हे लक्षात येऊन, ते सगळे घाबरून पळून जातात. आपली अब्रू वाचल्यामुळे हिरोईन खूश होते. ती नागाला वंदन करते. तोही त्याच फण्याने तिला आशीर्वाद देतो. आता खरी कमाल पुढे आहे. मग ही बया स्वतःच्या ब्लाऊजमध्ये हात घालून एक राखी बाहेर काढते आणि त्या नागाच्या मानेला बांधते. हा सीन बघून आपल्या डोळ्यातून अश्रूच येतात. हे प्रकरण इथेच थांबत नाही. “थांब जरा, आलोच...” या अर्थाने फणा हलवून नाग वारुळात जातो. आणि...... दोन रुपयाची एक नोट घेऊन येतो आणि तिला ओवाळणी घालतो !!! यापेक्षा भयानक सीन माझ्या बघण्यात आजपर्यंत आलेला नाही. कोणी बघितला असेल, तर जरूर कबूल करावे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंमत तर पुढेच आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि मग नागाच्या वारुळावर इन्कम टॅक्स वाल्यांची रेड पडते .
😝😂😝😂🤣😝😂😝😂🤣
*( काय quarantine day 6 मधली 10 मिनिटे मजेत गेली नं )*
आता मला या 🤦♀🤦♂🙆🙆♂ असल्या emoji पाठवू नका .🤣😉😉😉😆😆😆😆😆😆😆😆😆
No comments:
Post a Comment