Adsense

Wednesday, April 1, 2020

भयानक सिनेमा



भयानक सिनेमा काढायला भाषा आणि काळाचे बंधन नसते. फार पूर्वी एक अमराठी फिल्म बघितली होती. ब्लॅक अँड व्हाईट आणि फुजिकलर यांच्यामधली कोणती तरी होती. त्यात एक लोकोत्तर सीन होता. त्यात ती जी काय, हिरोईन म्हणून भारदस्त नटी कामाला असते .तिच्यावर व्हिलनचा डोळा असतो. आणि मग एके दिवशी मनात रेपात्मक कारवाई करण्याचा अत्यंत दुष्ट विचार घेऊन तो त्याच्या टोळीसकट तिच्या पाठीमागे लागतो. आपली अब्रू जाऊ नये म्हणून ती हिरोईन यथाशक्ती धावत सुटते. हे पाच लोकही भरपूर रिळं शिल्लक असल्याने काही अंतर ठेवून हळू हळू धावत असतात.  मग हिरोईन पळता पळता जंगलात शिरते. हे सुद्धा नाइलाजाने तिच्या पाठोपाठ जंगलात शिरतात. आणि एका दगडाला अडखळून हिरोईन धप्पकन पडते. रेप्या व्हिलनला भलताच आनंद होतो. तो मोठयाने हसतो. बाकीचेही हसतात. बाकीचे का हसतात ते कळले नाही. दुसर्याच्या सुखात सुख मानायची वृत्ती, असेच काहीसे असणार.  मग रेप्याचा क्लोज दिसतो. त्याच्या डोळ्यातल्या वासना पार हनुवटीपर्यन्त आलेल्या असतात. तो गलिच्छ अभिनय बघून हिरोईन अजूनच घाबरते. मग स्वतःचे फोरआर्म जमिनीवर ठेवून ती हळूहळू विरुद्ध बाजूला सरकू लागते. [ देवदासमधील मार डाला गाण्यात माधुरीची अशी काहीशी स्टेप आहे. ] ती जमिनीवर पडल्यामुळे रेप्या वाकून वाकून पुढे येत असतो. आणि काय मौज सांगू महाराजा....हिरोईन एका वारुळाला धडकते. त्या वारुळातून एक नाग येतो. मग हिरोईन त्याला सगळी सिच्युएशन सांगते. नागालाही सिच्युएशनची ग्रॅविटी लक्षात येते. तो थोडा विचार करतो. [ असा शॉट आहे त्यात ] आणि मग तिला वाचवायचा निर्णय घेऊन तो त्या व्हिलनकडे एक दर्जेदार फूस्स टाकतो. म्हणजे आपला फणा त्याच्याकडे “बाबाजीका ठुल्लू” स्टाईल पुढे करतो. त्या फण्यामुळे रेप्या घाबरतो. मग त्याच्या साथीदारांनाही नाग एकेक फूस्स देतो. या नागड्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही, हे लक्षात येऊन, ते सगळे घाबरून पळून जातात. आपली अब्रू वाचल्यामुळे हिरोईन खूश होते. ती नागाला वंदन करते. तोही त्याच फण्याने तिला आशीर्वाद देतो. आता खरी कमाल पुढे आहे. मग ही बया स्वतःच्या ब्लाऊजमध्ये हात घालून एक राखी बाहेर काढते आणि त्या नागाच्या मानेला बांधते. हा सीन बघून आपल्या डोळ्यातून अश्रूच येतात. हे प्रकरण इथेच थांबत नाही. “थांब जरा, आलोच...” या अर्थाने फणा हलवून नाग वारुळात जातो. आणि...... दोन रुपयाची एक नोट घेऊन येतो आणि तिला ओवाळणी घालतो !!! यापेक्षा भयानक सीन माझ्या बघण्यात आजपर्यंत आलेला नाही. कोणी बघितला असेल, तर जरूर कबूल करावे. 

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंमत तर पुढेच आहे 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.


आणि मग नागाच्या वारुळावर इन्कम टॅक्स वाल्यांची रेड पडते .

😝😂😝😂🤣😝😂😝😂🤣

*( काय quarantine day 6 मधली 10 मिनिटे मजेत गेली नं )*



आता मला या 🤦‍♀🤦‍♂🙆🙆‍♂ असल्या emoji पाठवू नका .🤣😉😉😉😆😆😆😆😆😆😆😆😆







Friday, March 27, 2020

आजची सकाळ

सकाळी सकाळी उठून जरा घराबाहेर पडून  काय चाललंय बघूया म्हणून दार उघडलं तर काय आश्चर्य दारात छत्रपती शिवाजी महाराज उभे . त्यांनी माझ्यावर तलवार रोखली आणि म्हणाले खबरदार जर घराबाहेर पडलास तर शत्रू महाभयंकर आहे . सध्या फक्त गनिमी कावा . मी घाबरून महाराजांना मुजरा करून दार लावून घेतलं . रोगाच्या भयाने त्रस्त झालो अस्वस्थ झालो . तितक्यात बाबा आमटे आले माझ्याबाजूला . सोफ्यावर बसले .  त्यांनी मायेने हाथ फिरवला आणि म्हणाले अरे रोगाला घाबरून काय होणार आहे . फक्त त्याला नीट जाणून घेता आलं म्हणजे मिळवलं . मला थोडं हायसं वाटलं . मी म्हटलं तुम्ही असायला हवे होतात बाबा आता . ते म्हणाले मी नसलो तरी माझ्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत कि डॉक्टर आणि सेवकाच्या रूपात . तू बिनधास्त रहा . फक्तं त्यांच्यावरचा भार वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या . असं म्हणून बाबा आमटे गुप्त झाले . आता २१ दिवस घरी बसून काय करायचं याचा मी विचार करत होतो तोच गाडगे महाराजांनी मला झाडू ने झोड झोडलं . म्हणाले अरे मी ओरडून ओरडून सांगितलं रे कचरा साफ करा मनाचा आणि परिसराचा .. केलीत ना घाण . आता निदान तू तुझ्या घरातला तरी कचरा काढ . बाहेरचा  कचरा काढणारी माणसं राबतायत तुमच्या साठी तुम्ही कचरा केला नाहीत तरी पुष्कळ ..गुमान झाडू घेतली आणि कचरा काढायला लागलो . तितक्यात सावरकर आले म्हणाले आता कळलं कैद म्हणजे काय असते . पण घाबरू नकोस या कठीण काळात  तू तुझ्यातल्या लेखणीला आणि विचारांना खतपाणी घाल .. २१ काय ५० दिवस पण सहज जातील . मी त्यांना विचारलं पण खाण्याचं काय तितक्यात गांधीजी आले म्हणाले गरजा कमी कर आवश्यक तेवढंच खा . आणि सावरकर गांधीजी एकत्र हसत हसत निघून गेले . मला कळलं नाही मग आम्ही का भांडतोय आजही यांच्या नावाने .मला कळलं हाच तो काळ शहाणं होण्याचा . मी खिडकीत जाऊन त्यांचे आभार मानावे म्हटलं तर . दाभोळकर खिडकीत उभे त्यांनी मला बंदुकीची गोळी काढून दाखवली म्हणाले हीच ती अविवेकाची गोळी . तू विवेक घालवून बसू नकोस विज्ञानावर विश्वास ठेव एक दिवस नकीच यातून मार्ग काढशील .

मी म्हटलं चला आता या एकवीस दिवसात यांच्या विचारांची सोबत मला नकीच साथ देईल …   

महेंद्र तुकाराम कदम .

Tuesday, March 24, 2020

पुस्तके

कोणाला घरी करमत नसेल तरी खालील लिंक चा वापर करा आणि पुस्तके वाचा. पण अजिबात घरा बाहेर नका पडू. काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या परिवाराची.

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

*तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल*

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

Monday, March 23, 2020

लहान होत तेच बर होत....

*लहान होत तेच बर होत....*
लहान होत तेच बर होत,
ना कशाची काळजी,ना कशाची चिंता होती
बॅट- बॉल, विटी- दांडू हीच आमची दुनिया होती....🤗

ना मनात पाप,ना शिक्षणाचं ओझ    होत,
मोठ होऊन काय व्हायचंय हे तेव्हा कुणी ठरवल होत,😅
नेहमी वाटायचं मोठ व्हावं मोठ्यांसारख वागावं
पण आता कळतंय, लहान होत तेच बर होत....😔

वय वाढलं,ओझ वाढलं दबला खाली खांदा
दबलेल्या खांद्याखाली बालपणाचा पार चुराडा झाला,
मोठ होऊन जर अपेक्षा पूर्ण करण्याचं काम होत,
तर लहान होत तेच बर होत...😔

या धावपळीच्या जीवनात त्या आठवणी पुन्हा ताज्या होतायेत
जेव्हा आम्हाला काही काम नव्हतं🙃
आता वाटतंय *लहान होत तेच बर होत....* 😔
  - ओंकार वाघ(बारामती)







फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...