Adsense

Sunday, August 18, 2019

समई...



Provided by OpeSpeedtest.com


जन्माला येताना आपण एक चेहरा घेऊन जन्माला येतो. कळायला लागल्यावर आपण सोयीनुसार त्याच्यावर मुखवटे चढवतो, बाळगतो, वापरतो, सराईत होतो. शालीनतेचा, सोज्वळतेचा, ज्ञानाचा मुखवटा मात्र कायमस्वरूपी सांभाळता येत नाही, वागवता येत नाही. सिंहाची कातडी कधीतरी उघडी पडते आणि कोल्हा दिसू लागतो तसं होतं. सुषमा स्वराज यांचा चेहरा हा मुखवटा नव्हता. अतिशय शालीन, आपलासा वाटणारा, हसतमुख, बघितल्यावर विश्वास वाटावा असा मायाळू चेहरा असलेली ही बाई राजकारणी कधी वाटलीच नाही, आई वाटली.

राजकारण म्हणजे कोळश्याच्या खाणीत पांढरे स्वच्छ कपडे घालून डाग लागू नये याची काळजी घेत काम करण्यासारखं आहे. शालीनतेचा, सज्जनतेचा, चारित्र्याचा एक दबदबा असतो जो त्यांच्याकडे होता. आदळआपट न करता, वैर न धरता, अभ्यासपूर्ण, मार्दवतेने बोलून मुद्दा मांडणं यासाठी स्व'भाव हवा, त्वरीत यशाची अपेक्षा धरणा-या माणसाला ते शक्य नसतं. राजकारणात सगळेच गरजेचे असतात, पन्नास चेंडूत शंभर करणारा काहीवेळा गरजेचा असतोच पण सावरणारा, कठीण प्रसंगी ठाम उभा रहाणारा, संयम बाळगून प्रतिपक्षाला नामोहरम करणारा द्रविड लागतोच. स्वराज तशा होत्या, पेशन्स असलेल्या. अटलबिहारी, पर्रीकर अशी काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी सुसंस्कृत माणसं राजकारणात होती, त्यातलं एक बोट अजून कमी झालं.



यश, सुख, आनंद मिळाला तरी तो भोगण्याचं नशिबात लागतं. ज्या विचारधारेला त्यांनी आपलंसं केलं त्याचा विजय होत असताना, एकेक स्वप्नं सत्यात येत असताना ते बघण्याचा आनंद मोठा असतो. अशी अनेक अधुरी स्वप्नं उराशी बाळगून असतील त्या. ३७० चा आनंद त्यांना फार काळ साजरा करता नाही आला पण उराशी समाधान असणारच शेवटचा श्वास घेताना. 'राष्ट्र प्रथम' हे वागण्यात दाखवून देणा-या, जात, पक्ष, धर्म, देश या पलीकडे जाऊन अनोळखी माणसाच्या मदतीला धावून जायला मोठं मन लागतं, ते त्यांच्याकडे होतं. स ची बाराखडी लिहावी तसे गुण आणि नाव बाळगलेल्या सहृदयी, सन्माननीय, सोज्वळ, सुंदर, संयमी, सुसंस्कृत, सज्जन सुषमा स्वराज आज एक अभिमान वाटावा असा वारसा ठेवून घाईघाईने निघून गेल्या. नात्यागोत्यातल्या नसलेल्या, ज्यांना कधीही समक्ष पाहिलं नाही अशा माणसाच्या जाण्याने डोळ्यात अश्रू येईल अशी माणसं आता दुर्मिळ आहेत. आज मात्र परवानगी न घेता डोळे ओलावलेच. आदर्श ठेवणा-या माणसांसाठी हे झालं नाही तर आपण माणूस नाही हे नक्की.

प्रकाश काजव्यामुळे पण मिळतो, सूर्यामुळे पण मिळतो, एक क्षणिक तर एक दीपवणारा पण गरजेचा. आपल्याला या सगळ्यात भावतो, गरजेचा वाटतो तो शांत, आश्वासक प्रकाश समईचा असतो. समईची ज्योत मोठी नसते पण ती 'मी आहे' हे सांगणारी असते, आशादायी असते. अज्ञानाचा, असत्याचा, दुष्टपणाचा तम जेंव्हा अवकाश पादाक्रांत करतो तेंव्हा या ज्योतीचा उपयोग असतो. नंदादीप जाहिरात करत नसतात तर 'मी आहे, होईल सगळं नीट' असं मूक आश्वासित करत असतात. जगण्यासाठी अशा नंदादीपासारख्या तेवणा-या समया गरजेच्या असतात.

आज एक समई शांत झाली,
http://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?ad_type=video&client=ca-games-pub-4968145218643279&videoad_start_delay=0&description_url=http%3A%2F%2Fwww.go
जयंत विद्वांस

Saturday, August 17, 2019

नक्की वाचा,डोळ्यांत पाणी येईल

रात्री ११ ची वेळ.....
ती दादर च्या स्टेशन वर लोकलची वाट बघत होती....
कानात हेड फोन घालून मस्त गाणी ऐकत होती...
नेहमीची १०.५० ची लोकाल
तिला चुकलेली...
त्यामुळे आतापुढच्या लोकल
ची वाट बघण्याखेरीज तिच्याकडे
दुसरा पर्याय
देखील नव्हता....
…❤❤❤…❤❤❤
जसा जसा वेळ जात होता तसं तसं तिला काळजी वाटत होती...
तसं लहानपणापासून मुंबईत राहणारी...
दादर ते डोंबिवली रोजचा प्रवास ठरलेला..
पण तिला काळजी वाटत होती कारण आज
तिला बारा च्या आधी घरी पोहोचायचं
होत....
तिच्या आईचा वाढदिवस होता ना.!
सुरेखा...!.सुरेखा नाव तीच..
जेमतेम २५ वय असेल तीच..
पण वयाच्या मानाने तिने खूप काही सोसलं होत...
मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती...
बापाची नोकरी गेलेली …त्यात
तो बेवडा ,आई
थोड काम करून पैसे जमवायची आणि बाप
ते
पैसे
दारू मध्ये घालवायचा.…❤❤❤
सुरेखा खूप,शिकली चांगला जॉब पण मिळाला....
अन नुकताच तीच लग्न पण ठरलेलं ,२ महिन्यानंतर चा मुहूर्त होता.…❤❤❤
थोड्या वेळात लोकल आली....
ती लगेच गाडीत चढली,आज गाडी रिकामीच होती....२,३ मुली होत्या....

त्या पण थोड्या वेळाने पुढच्या स्टेशन वर उतरल्या.
अन अचानक……❤❤❤

ट्रेन मध्ये ३-४ तरुण चढले,तोंडावरूनच ते टपोरी वाटत होते...
सुरेखा थोडीशी बावरली....
पण तिने गाण्यांचा आवाज वाढवला आणि मस्त गाणी ऐकत बसली....
हळूहळू गाडीनेही थोडासा वेग वाढवला....
एवढ्यात ते ४ जण तिच्या जवळ येउन बसले....

आता मात्र ती चांगलीच घाबरली...
त्यातलल् या दोघांनी शेरेबाजी सुरु
केली त्यांच्या तोंडातून
अश्लील शब्द ऐकून तिला खूप विचित्रच
वाटल...

ती उठली…
अन दरवाजा कडे जाऊन उभी राहिली...
तिने मनात सर्व देवांची विनवणी केली...

पुढे काय घडणार आहे...
ते
तिला चांगलंच कळून चुकलं
होत....
तेवढ्यात तिला तिच्यापाठीवर स्पर्श जाणवू
लागला...
आता मात्र,ती बिथरली .…❤❤❤
डोळ्यातून
आसव
गळू लागली...
तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या दणकट हातांसमोर तिच्या कोमल
हातांचा प्रतिकार म्हणजे हत्तीला मांजराने
प्रयत्न करण्यासारखे होते....
त्यांचे वासनेनेबरबटलेले हाथ
तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत
होते....

तिच्या छातीवरचीओढणी दरवाज्यातून उडून
गेली होती...
ती नुसती थरथरत होतीे....
अचानक तिची हालचाल बंद पडली....
तिचे शरीर थंड पडले.....
तिने मनाशी एक निर्णय घेतला आणि त्या धावत्या लोकल मधून
तिने,
स्वतालाझोकून दिले ....…❤❤❤
या कुत्र्यांच्या हाती लागण्यापेक्षा तिला
जास्त सोयीस्कर वाटला...
दगडांवर आपटून तिच्या शरीराचे तुकडेतुकडे झाले होते.……❤❤❤
त्या नराधमाना याची काही काळजी नव्हती....
खिशातली सीगारेट
पेटवली आणि म्हणाला…
”मेली कर्माने….
आमच् कामी आली असती ते पण नाही....”
…❤❤❤……❤❤❤....❤❤❤

तिच्या आईला रात्री बारा वाजता फोन
आला...
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नव्हे तर,
एकुलत्या एक कमावत्या लग्न
ठरलेल्या मुलीच्या मृत्युच्या बातमीचा तिच्या
सुरेखाचा हसरा चेहरा उभा राहिला .........

पुढे मी काही लिहिण्याची गरज नाही..…❤

कित्या मुलांनी अस का केल ,तिच्या आईच काय होणार …..
तुमच्या वाचकांपैकी सर्व चांगल्या घरातून
असाल आणि तुम्ही असे काही करणार
नाही याची मला खात्री आहे
आणि “त्या”
लोकांनी जर हे वाचले तर त्यांच्यात
काहीही फरक होणार नाही हे देखील
मला माहित
आहे.....
जाताजाता एवढंच........
"देवा तुझ्या गाभा-याला उंबराच
नाही,
कुठ सांग ठेऊ माथा, कळेनाच काही....
देवा कुठं शोधू तुला, मला सांगना....
स्त्री जन्म घेतला एवढंच रे
गुन्हा!”? ………
जर तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट Share
करण
काळाची गरज आहे तर Share नक्की करा....

Friday, August 16, 2019

पहिलं प्रेम❤️❤️❤️

प्रेम ❤️करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि
झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल.

मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात माझ्या गावापासून तिचे गाव पाच किलोमिटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्याजाण्यासाठी बसही एकच... हा एक निव्वळ योगायोग, सुरुवातीला तिच्या शेजारीही मी बसत नव्हतो, गाडीला गर्दी होत असल्याने मी ताटकळत उभा राहायचो. पंधरा दिवसानंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक, तिने येतानाच, तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, मात्र बसलो नाही, तिनेच बस ना, म्हटल्यावर अंग चोर बसलो... आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमच प्रेमाचा काटेरी प्रवास.. एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, हे कळालेसुद्धा नाही, गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बेफिकीर असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ‘ती’ त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओघात स्टँड कधि यायचे कळायचे ही नाही
.
हा प्रवास संपूच नये असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टीस शेवट हा डरलेलाच असतो. आमच्या प्रेमाला ती बस तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षिदार होते पहिल्या प्रेमाचे... रविवारी ती येत नसल्याने, मन बेचैन व्हायचे, सोमवारी तिला पहिल्याशिवाय करमत नसायचे, गोड हसायची आणि गोड बोलायची, शिक्षण संपल्यावर जिवनसाथी बनण्याच्या आणाभाका ही घेतल्या कॉलेज, कॉलेज कॅन्टीन, सगळीकडेच आमच्या प्रेमाच्या चर्चा आसायच्या,एस.टी.त पटवलेली पोरगी म्हणून चिडवायचे...
प्रेमप्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास.. तिचे कॉलेज बंद झाले, माझ्या बापाने, भावाने मुलीचा तपास काढला, आणि प्रेमाला विरोध सुरू झाला. तिच्या घरच्यांनी तिच्या काही माझ्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले. ते स्वत:हून घरी ही आले, पण माझ्या घरच्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला, मी काहीच बोलू शकलो नाही.

अपराध्यासारख्या आमच्या नकारा नंतर मात्र तिच्या साठी स्थळ शोधू लागले. परीक्षा ही दिली नाही, शिक्षण आणि प्रेम... अर्ध्यावरच सुटले, माझ्यामुळेच... आणि तिचे लग्न झाले... आणि आडवले ते तिने केलेले पहिले प्रेम.. लग्नानंतर ब-याच महिन्यानंतर मी माझ्या गावच्या पाटीवर उभा होतो... माझ्या बापाने मला टमटम घेऊन दिले होते, टमटम मध्ये बसलो असतानाच पांढ-या शुभ्र रंगाची एक अलिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली, गाडीचे काच खाली झाले आणि त्यात ती दिसली. पांढ-या शुभ्र पंजाबीवर, बॉब कट केलेली अगदी परिसारखी दिसणारं माझं पहिलं प्रेम होतं ते... मी मात्र मान खाली घातली तिच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही, तिचा नवरा इंजिनियर होता. तिचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते. मी मात्र तिला धोका दिला होता ती दिसली आणि पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली. 

Thursday, August 15, 2019

#माणुसकीचे दर्शन............................( नक्की वाचा )



नमस्कार मी अनिकेत वाघमारे एक सुंदर अशी रचना सादर करतो आहे " माणुसकी " अश्या एका अदृश्य विषयावर काही विचार मांडतो आहे.......
माणुसकी.......पण नेमकी माणुसकी म्हणजे काय......?🤔

आपण खरंच माणूस म्हणण्याचा तरी लायकीचे आहोत का....?

माणसाचा मुखवटा घातलेली करोडो व्यक्तिमत्त्व आहेत
काही आपल्या रोजच्या दिनचर्येत भेट देत असतात मग ते मित्र.नातेवाईक,ओळखी-अनोळखी अश्या अनेक लोकांशी आपला सवांद साधतो.पण कोणी त्याच्या आत धूर्त कोल्हाबा असतो,कोणी विषारी साप असतो.खर तर आज धावपळीच्या युगात आपण साधी माणसं तरी उरलो आहोत की नाही याची शंका मला असते.रस्त्यावर अपघात घडलेला दिसला तरी आपण न थांबता, त्याच्या मदतीला न जाता ऑफीसला कामाला उशीर होईल म्हणून पुढं निघून जातो.कित्येक लोकांचे जीव जातात योग्य वेळी मदद न मिळाल्या मुळे आता अस दिसून येते की तो मदतीचा हात पॅन्टचा खिशात जातो फोटो काढायला ज्याची-त्याची लगबग असते सर्व फोटो टीपायची................याला म्हणतात का माणुसकी .....?

सिग्नल लागल्यावर भिकारी मुलं दिसली तर त्यांना एखादा रुपया देतो.शिवाय तो मुलगा,लंगडा किंवा आंधळा खरा खुरा आहेका याचा आधी शोध घेतो,शंका घेतो.मंदिरात पैसे देण्यासाठी आपल्यात कुठलीच शंका नसते.मी दान करतो आहे म्हणजे मी माणुसकी दर्शवतो अशी खोटी समज आपल्यात रुजली आहे.सर्व काही देखावा ठरतो आहे. दहीहंडी,होळी गणपती अश्या अनेक कामात वर्गणी देणे आणि विविध मनोंरजन कार्यक्रम करुण लोक गोळा करने खुप प्रसिद्धी आणि व्वावाही मिळवणे यात आपल्याला माणुसकी वाटते.बाघा आता ज्या पोराने कधी आईबापाला घोटभर पाणी नसेल दिले तो पोरगं नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं खुप फोटो सोशल साइट वर मिरवतो.आणि स्टेटस टाकतो
" i love and believe in humanity "

अशी उरलेली आहे आपली माणुसकी...............!

पण,
अडाण्यांना शिकवणं, वृद्धांना वेळ देने,अनाथ आश्रमात भेटदेणे,मनोरंजनाचे पैसे वाचवून ते अनाथ,गरीब मुलांना प्रत्यक्ष देणं हे आपण विचारच करु शकत नाही.कधी कधी वाटत माणुसकी म्हणजे देखावा...! खरंच माणुसकी हरवतेय याचा विचार मनापासुन केला पाहिजे.म्हणुन नुसता विचारच नाही तर त्याच प्रत्यक्ष अनुकरणही झाले पाहिजे...

माझ्यामते आता रस्ते डांबरी झाली आणि माणसंही डांबरट झाली म्हटल तर हरकत नाही कारण,रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीला दवाख्यान्यात नेऊन टाकण्याचं सौजन्य कुणी दाखवत नाही,हवं तर फोटो काढतील,आपल्या मित्रांना share करतील पण मदतीचा हात कुनलाच नाही.प्रत्येकाला भीती आप-आपल्या परिवाराची,आपल्या संपत्तीची मात्र देश खड्यात गेला तरी आम्हाला फरक पडत नाही.
मग बघा स्वार्थच सर्वाना असत तर मनुसकीचे दर्शन कुठे होणार...?
मेणबत्त्या जाळल्या म्हणून आपन माणुसकी दर्शवतो ही खोटी समज आहे खर तर माणुसकीचा हात पुढे केला तर सर्व चित्र सुधारु शकते...!

पण कोण माणुसकीणे वागनार .........!

बदल हवा,बदल हवा अश्या बोम्बा मारत बसतो पण स्वतः आपन कधी बदलणार ...? याचा विचार कोणीच करत नाही

माझे विचार माणुसकी म्हणजे काय ......?
जे जे मला हवे ते ते दुसऱ्याला देण म्हणजे माणुसकी गाडगे बाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिल,तहानलेल्यांना पाणी पाजल,रोग्यांची सेवा केली,धर्मशाळा बांधल्या सावित्रीबाई फुले,महात्मा फुलेंनी शाळा काढली हे खरे मानवता धर्माचे प्रतीक आहेत.आपणही आपल्या आयुष्यात दुसऱ्यांच्या सुखासाठी,आनंदासाठी,हितासाठी काही करू शकत असू तर आपणही मानवता धर्माच प्रतीक बनू शकतो अस मला वाटत.

आता बघा

स्वतःला एक प्रश्न करा मी माणुसकी म्हणुनन आजवर काय केले......

बरेच लोकांच उत्तर हे असेल 👇🏼👇🏼👇🏼👇🏼

भिकाऱ्यांना आणि दानपेटीत दान

इतर काही अजुन आठवत का आपल्याला...?

बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती सोडल्या तर बऱ्याच लोकांकडे या प्रश्नाचे उत्तर देखील नसेल कारण आपल्याला माणुसकी पेक्षा स्वार्थ प्रिय आणि श्रेष्ठ वाटत.....

माझ्यामते माणुसकी म्हणजे ....
माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.खर तर माणुसकीने जगन म्हणजे ही वेगळीच कला आहे व त्याचा आनंद एक वेगळा अनुभव देतो.अनुभव #माणुसकीचा #माणुस म्हणून जगण्याचा.
माझा रोज असा काही प्रयत्न असतो..
शेवटी...
मित्रांनो या माणुसकीच्या बाजारात माझ्यातला एक रचनाकार  “खरा माणूस’ शोधतो आहे. पण तो शोध कधीच पूर्ण होईल असं वाटत नाही.......!!

मनात आले ते मी शब्दात मांडले,मनापासून आवडल असेल तर इतरांना पाठवा....

मी चुकीचा असेल तर मूर्ख म्हणून सोडून द्या
मी विद्वान नाही साधा-सरळ एक रचनाकार आहे ......

✍️ ✍️ - अनिकेत वाघमारे ( एक रचनाकार ) नागपुर,

विमानतळावर एक मुलगी



एकदा एका विमानतळावर एक मुलगी
वाट पाहत बसली होती.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच
स्टोअरमधून एक पुस्तक आणि
बिस्कीटपुडा खरेदी केला.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती
“व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन
पुस्तक वाचत बसली.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ
वर्तमानपत्र वाचत बसले होते.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
तिने एक बिस्कीट खाताच
त्यांनी ही त्याच पुड्यातून एक
बिस्कीट घेऊन खाल्ले.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून
तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!
माझ्या अंगी थोडी हिंमत असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच
सरळ केलं असतं!’
ती मनात विचार करत होती.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे
सुरूच होते.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
“आता हा हावरट मनुष्य ते
बिस्कीट स्वत: खाईल, का मला
अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
ती विचार करत होती.
“”आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर
पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली.
पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा
पर्समध्येच होता.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे
खाल्ली, याची तिला खूप लाज
वाटली.
एका शब्दानेही न बोलता त्या
व्यक्तीने आपली बिस्किटे
तिच्यासोबत वाटली होती.
तिने नजर टाकली, तर शेवटचे
बिस्कीटही त्याने तिच्यासाठी
ठेवले होते.
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा
आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले
आहे; पण आपल्याला त्याची
जाणीवच नसते.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा
वाईट बोलताना आपण सर्व
गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात
तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
"चांगली वस्तु",
"चांगली व्यक्ती" व
"चांगले दिवस"
यांची किंमत" निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे,
तोच खरा "श्रीमंत".
चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी
समुद्र किनाऱ्यावर आठवणींना
घेऊन बसावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा
कधीतरी पहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
आकाशातले तारे कधीच मोजून होत
नाहीत, माणसाच्या गरजा कधीच
संपत नाहीत शक्य तेवढे तारे
मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
बघा विचार करा....

बिरबल व राजाचा पानवाला


अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे.
तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’
बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.
एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली. त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’
शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.
आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’
या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’ पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.
‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.
शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’
‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.
‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले. ‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.
शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.
‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.
त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्‍याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’ ‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.
‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.
राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’
महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’
‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.
‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला. ‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.
थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’
‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला. ‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.
‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.
ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’
नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’

महाराष्ट्रातील भूतें




१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्रम्हणां पैकी भूत असते.जो ब्राम्हण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिव्हा : जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे कुणबी किंव्हा मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षञाय जातीच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
१७ : वायंगी भूत
कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणातील हे वायंगी भूत फार प्रचलित आहे. हा प्रकार केवळ कोकणातच पहावयास मिळतो.घराच्या भरभराटी साठी या भूताचा वापर करतात.कोकणात हमखास बहुतेकांच्या घरात हा भूतांचा प्रकार बघायला मिळतो.
प्रथम या भूता बद्दल जाणून घेऊ. वायंगी भूत हे मोरा एवढे मोठे व कोबंड्या पेक्षा लहाण अशा पक्षाच्या आकाराचे असते.ही भूते भारण्यासाठी नारळ किंव्हा नदीच्या पञात मिळणारे काटेरी वांगे जे आकाराने लहाण असते आशा वस्तूत भारले जाते व जातकाला दीले जाते.
एखाद्या चाडी प्रमाणे हे भूत काम करते.ते जातकाच्या कानात गुणगूणत असते. हे भूत मुदतीच्या स्वरूपात दिले जाते. ज्या माणसाला जितके वर्ष पाहीजे असते. तितक्या वर्षासाठी हे भूत विकत मिळते.व जितके वर्ष हे त्या माणसाच्या घरात रहाते तितके वर्ष हे त्या माणसाला धन संप्पती प्रदान करते. त्याला भरभराट देते.
हे भूत मुख्यत: गरीबाला श्रीमंत व श्रीमंताला गरीब बनवण्याचे काम करते.
पण याचे काही दूश् परीमाम ही आहेत. हे भूत जितक्या वर्षासाठी आहे तितक्या वर्षासाठी भरभराट देते. व एकदा या भूताची मुदत संपली की ते माणसाला मुळा सकट घेऊन जाते. त्याला जितके त्याने प्रदान केले आहे त्याच्या कितीतरी पट जास्त घेऊन जाते.त्या मानसाचा सर्वनाश करते.व त्याला अचानक काळाच्या पडद्याआड करते.
एवढेच नव्हे तर त्याच्या वारसांना,नाते वाईकांना देखिल ञास देण्यास सुरूवात करते.कधीकधी ते शेजा-यांना देखिल बाधते.अक्षरक्ष: माणसाला नरक यातना भोगावयला भाग पाडते हे भूत.
ज्यानां आपल्या भावी पिढीची व वंशाची किंमत नसेल त्यांनीच हे भूत आणायच्या भानगडीत पडावे.
लक्ष्मी ही चंचल असते ती केंव्हाही योग्य मार्गाने प्रसन्न करून घ्यावी...........

कारखान्यातले भूत



कोणे एके काळी भंडारा जिल्ह्यात
विड्या वळण्याचा उद्योग
भरभराटीस होता.स्वस्त आणि मुबलक
मनुष्यबळ,जंगलात
मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे
आणि विडी कारखान्याला असणारे पोषक
वातावरण, ह्यामुळे बर्याच
उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते.
सिगारेटींचे एवढे प्रस्थ
नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच
फ़ुंकल्या जात. एकूणच
विडी कारखान्यांना भरभराट होती,
नफ्याचा उद्योग होता.
काळ बदलला. विड्या ओढणे
गावंढळपणा झाला.
सिगारेटी ओढणे 'फॅशन' म्हणवू लागली.
आता गावागावांत,
चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत
'स्टाईल' मारु लागली .
विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत
होती.
नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे
जंगलातून तेंदूपत्ता आणणे
जिकीरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग
झाला.
विडी कारखान्यांना ओहोटी लागली.
गावोगावचे छोटे कारखाने बंद
पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण
बरेचसे नतमस्तक
झाले.
असाच एक
विडी कारखाना एका छोट्याशा गावात
टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले
की घराचे
वासेही फिरतात. जेमतेम टिकून
असलेल्या या कारखान्याला एके
दिवशी आगीने कवेत घेतले.( गावात
अजूनही लोक कुजबुजतात की,
आग मालकानेच
लावली आणि विम्याची रक्कम खिशात
घातली. )
कारखाना सार्या मुद्देमालासकट भस्मसात
झाला.
मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर
तेवढे टिकून राहिले. आग
विझवण्याच्या प्रयत्नात दोन कामगार
मात्र बळी पडले.
कारखान्याच्या कंपाउंडबाहेर
कामगारांसाठी मालकाने २०-२१
घरांची एक वसाहत बनवली होती.
कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंबं
नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र
पांगली. मालकाने चाळ भाड्याने
चढवली. गावात बदली होऊन
येणार्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ
सोयीची होती.
कारखान्याच्या भव्य
लोखंडी फाटकाला मोठे कुलुप चढवून
आणि गावातला आपला बंगला विकून मालक
शहरात रहायला गेला.
वर्षामागून वर्षे गेली.
जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे
छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता.
आवारातल्या सुंदर बागेचे
रुपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज
चढला.
चाळीला कारखान्यापासून
वेगळी करणारी कंपाउंड मोडकळीस आली.
अशा इमारतींसोबत
भुतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत
तरच
नवल. आगीत बळी गेलेल्या त्या दोन
कामगारांचा भूत म्हणून
पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत
अनेक
भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे
कुटुंब रहायला आले की ,
त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई.
मुलाने जास्त
मस्ती केली की,
त्याला कारखान्यातल्या भुतांचे भय दाखवले
जाई. '
अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन
सोडेन'
म्हणण्याचा अवकाश , मुलगा लगेच
अभ्यासाला बसे !
एके दिवशी चाळीत नवे कुटुंब रहायला आले.
नवरा-
बायको आणि दोन मुले असे छोटेखानी कुटुंब
होते.
घरप्रमुखाची बॅंकेची फिरतीची नोकरी, २-३
वर्षांत बदली व्हायची.
शेजारी आले, विचारपूस केली,
गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजारधर्म
पाळत
कारखान्याचीही सविस्तर
माहिती दिली.
हळूहळु ते कुटुंब चाळीत, गावात चांगलेच रुळले.
जवळच
असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ
थोडे उनाड होते. त्याचे
नाव पंकज,एकदा तो कंपाउंडवरून उडी मारून
कारखान्यात
जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले
आणि त्याला ओढतच
परत आणले. अर्थात
उनाडक्या करणार्या मुलाला वठणीवर कसे
आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने
त्याला तिखट-मीठ
लावून
कारखान्यातल्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या.
खरे तर
तिचा भुतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने
पुन्हा पुन्हा कारखान्याकडे
जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बर्याच
वर्षांपासून बंद
असलेल्या कारखान्यात साप-
विंचवांचा धोका होता. रान माजले होते.
अशा जागी ती माउली आपल्या लेकराला कसे
जाऊ देईल ?
पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात
कुठेतरी भूत घर
करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात,
रातकिड्यांच्या किर्र-
किर्र आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की,
त्याच्या उरात
धडकी भरायची. कंपाउंडवरून
उडी मारण्याचा विचार मन
त्याच्या स्वप्नातही आला नाही.
वर्गात पंकजचा एक चांगला मित्र
बनला होता, अमोल.
अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता.
दोघांची चांगलीच
गट्टी जमली. दोघे एकाच बाकावर बसायचे,
एकत्र डबे खायचे
आणि खेळायचे.
शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून
तळ्याकडे
जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे
चिंचेचे झाड होते. दूर
कारखान्याची मागची बाजू दिसायची.
लांबच लांब काळपट लाल भिंत
आणि थोड्या-थोड्या अंतराने
असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या.
बरेचदा दोघेही सुटीत
त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे
छोटेसे विश्व होते.
निवांत बसून गप्पा मारायची जागा होती.
इथे वर्गातला,
पटांगणावरचा गोंधळ नव्ह्ता.
होता तो पक्ष्यांचा मंजुळ
ध्वनी आणि कुठुनतरी येणारा बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण
स्वर. वेगवेगळ्या विषयांवर
गप्पा मारायची ती हक्काची जागा होती.
त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत
चिंचेखाली बसले होते.
अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज
बोलला,
" तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत
असल ? "
" ह्या ss !! काहीच का बे ! आपन
अश्या फाल्तू गोष्टीवर
विश्वास नाही ठेवत. "
" अबे, पर सबच जन तं म्हनतंत ? "
" सबच जन म्हनतत म्हनून का झाला,
खरा थोडीच असल . मले
भुतावर विश्वास नाही. दिसला तं मानीन.
आमच्या बाजूच्या घरात
अमरभाऊ रायते. तो सांगते का,
तो कारखान्यात गेल्ता तं त्याले भूत
नाही दिसला. तो म्हन्ते का भूत नाय आहे .
आपला भरोसा आहे
त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज मानूस आहे तो. "
" हव ? "
" नाइ तं का. खोटा थोडीच सांगून रायलो.
आता मले सांग, लोक
म्हन्तेत का चिचेच्या झाडावर देवाल रायते.
आता आपन तं रोजच
या झाडाखाली बसतो का नाही ?
कधी कधी सायंकाळी सात
वाजेवरी बसून रायलो, पर तुले दिसली आहे ?
कधी का आपल्या आंगावर चढली ? नाही नं ?
असती तं
दिसली नसती का ? " अमोल विजयी मुद्रेत
पंकजकडे पाहत बोलला.
पंकजला उगीच ओशाळल्यासारखे झाले.
ह्या वयात
मुलांची मानस्थिक स्थिती विचित्र असते.
एखादा मित्र आपण जे करू
शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट
पराक्रम करत आहे
असे वाटत असते. घरची बंधने
आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे
आकर्षण अशा कात्रीच
तो सापडतो. मित्रासमोर
आपली प्रतिमा भागुबाईची होऊ नये असे
त्यांना वाटत असते. मग
तो मनातली भीती लपवतो, सारवासारव
करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच
बावळट
नाही हे
दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले.
" आपन बी भुताले काही भेवत नाही, पर
विश्वास ठेवाले
का जाते ? जगात चांगला आहे तं वाईट
बी असलच . देव आहे तं भूत
बी असलच ! "
" तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत. "
" अनं तुले का वाटते,
त्या कारखान्यातल्या विहीरीत
पाह्यला तं
मानूस साप बन्ते अनं तिच्यात पडते,
खरा असल ? "
" तुले कोनं सागंलन ? "
" नाही.....असाच इखनाल-तिखनाल
ऐकलाओ... "
खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनेच
सांगितली होती, पण
अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर
पटकन विश्वास ठेवतो ,
हे अमोलसमोर स्वीकार
करायची त्याला लाज वाटली.
तो पुन्हा आपले
हसे उडवेल अशी भीती होतीच.
" ते सब झूट आहे बे पक्या . असा कधी होऊ
शकते
का ?
वाटल्यास तूच त्या विहीरीत डोकावून
पाह्य. "
खरे तर तेव्हा पंकज " नाही भाऊ, मी कायले
रिस्क घेऊ ? "
म्हणणार होता , पण स्वतःला सावरून
तो म्हणाला, " हव बे, जाऊन
पाहावा लागल एखाद-दिवशी. "
" अबे, उद्याच जाउन जा. "
" हव."
घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे
जायला निघाले. वर्गात
पंकजच्या डोक्यात तोच विषय घॊळत
होता आणि शाळा सुटल्यावर
घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून
कारखान्यातले भूत काही जात
नव्हते.
रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने
विचार
केला की एकदा खरंच कारखान्यात
जायला हवे. भूत खरंच आहे
की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र
सुरू झाले,
" मी जाईन, पूरा कारखाना फ़िरीन. भूत आहे
का नाही पाहून येईन.
पर विहीरीत नाही पाहीन.
समजा विहीरीत पाह्यलो अनं साप होऊन
विहीरीत पडलो तं ? बाहेर कसा येईन ? बाहेर
आल्यावर आईले
का सांगीन ? पर सापाच्या रुपात आई मले
ओळखल का ? अनं बाहेर
येताच नाही आला तं ? मंग तं आई परेशान
होऊन जाईल. अनं
मी साप बनून का करीन ? शाळेत
कसा जाईन ? छी... भेपका अनं
उंदरं खावा लागल. यक्क थू ! नाही, आपन
विहीरीत नाही पाहावाचा.
पर कारखान्यात जाईन. भूत दिसलाच तं
त्याले 'अगा मामा,
अगा दादा ' करून पटवीन म्हंजे तो मले सोडून
टाकल.
काही नाही करल. उद्याच जाऊ का ? हव,
उद्याच जातो.. नाही,
नाही... उद्या नाही, मंग कई आरामात
जाईन." असा सगळा विचार
करत त्याला कधी झोप लागली हे कळलेच
नाही.
दुसर्या दिवशी वर्गात अमोलने
त्याला विचारलेच, "
का पक्या ? का म्हनतेस ? जाशील का बे
कारखान्यात ? "
" हव जाईन नं बे. कावून नाही जाईन ?
मी घाबरतो थोडीच !
"
आता जायचे तरा ठरवले आहे, तसे
अमोलला सांगितले पण, पण
जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता.
पुढचे एक-दोन दिवस
अमोल त्याला 'कधी ?'
विचारायला आणि हा 'लवकरच' असे उत्तर
द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले
आणि हा विषय मागे
पडला. पण कारखाना तर रोजच
पंकजच्या नजरेस पडायचा. त्यामुळे
हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात
नव्हता. ' कधीतरी आपन
कारखान्यात जाउन पाहायचे' अशी त्याने
मनाशी खूणगाठ
बांधली असली तरी तो दिवस काही उजाडत
नव्हता.
त्यांच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत
आले होते. एके
दिवस
त्याच्या आईला सामानाची आवराआवर
करतांना पाहिले. हे
दृश्य त्याच्या ओळखीचे होते.
बाबांची पुन्हा बदली झाल्याचे
त्याच्या लक्षात आले, त्याने आईने
विचारता उत्तर आले
की या रविवारी निघायचे आहे.
त्याला कारखान्यातल्य़ा भूताबद्दल
केलेला निश्चय आठवला. म्हणजे
त्याच्या हाती फक्त ४ दिवस होते.
मनाचा हिय्या करून कारखान्यात
भूताच्या शोधात जायचे
आणि ह्या प्रकरणाचा निकाल
लावायचा असे त्याने ठरवले.
मनाची तयारी करण्यातच पुढचे दोन दिवस
गेले.
शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून
कारखान्यात जायचे असे
त्याने ठरवले. मात्र त्य़ाने ही गोष्ट अजून
अमोलला सांगितली नव्ह्ती. आपण अजूनपर्यंत
कारखान्यात
गेलेलो नाहीहे त्याला कळले तर
तो आपली उडवेल, असे
त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण
सांगायचे असा त्याने
विचार केला.
शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला.
हिवाळ्याचे दिवस
होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे
गरजेचे
होते. त्याने कपडे
बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून
तो कंपाऊंडकडे गेला.
विटांच्या भिंतीत असलेल्या खाचांमध्ये
पाय रोवत तो भिंतीवर चढला.
भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर
फ़िरवली. हिवाळ्याचे दिवस,
संध्य़ाकाळचे पाच वाजले असावेत. प्रकाश
मंदावला होता.
बागेतली बेछूट वाढलेली झाडे, तण , झुडूप
आणि तो पडका कारखाना.
सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे
होते. तो भिंतीवरून
खाली उडी मारणार तेवढ्यात त्याचे लक्ष
झाडीत
दडलेल्या विहीरीकडे गेले
आणि काळजाचा ठोका चुकला. पण
आता माघार घ्यायची नाही असे त्याने
ठरवले होते. "जय बजंरग
बली, तोड़ दे दुश्मन की नली " म्हणत त्याने
भिंतीवरून उडी मारली.
मनात " भूत पिशाच निकट नहीं आवें...." सुरू
झाले होते
आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक-
एक पाऊल टाकत
होता. अचानक चर्र.. असा आवाज
झाला आणि त्याने भिंतीकडे धूम
ठोकली. पण, भिंतीवर चढतांना त्याने मागे
वळून पाहिले,
तेव्हा त्याच्या लक्षात आले
की तो पाचोळ्यावर पाय
पडल्याचा आवाज होता. " ह्या ss आपन
बिनफ़ुकट घाबरलो,
"त्याने मनात म्हटले. तो परत
वळला आणि आता सरळ
कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार
त्याचे लक्ष
त्या विहीरीकडे जात होते. कोण जाणे, पण
त्या विहीरीत एक
विचित्र आकर्षण होते. पण आपण विहीरीत
डोकावलो तर विहीर
आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप
बनलो तर मग आई
काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात
यायचा आणि तो विहीरीकडे जाणे
टाळायचा.
आता तो कारखान्याच्या अगदी समोर
उभा होता.
त्याच्या डोळ्यासमोर पोपडे
उडालेल्या जळक्या काळपट
भिंती होत्या. सगळीकडे
कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते
आणि खाली फ़रशी पाल्यापाचोळ्याने
झाकली गेली होती.
तो कारखान्यात शिरला.
दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या.
तो त्या खोल्यांत
शिरला. फ़ुटक्या कौलांतून प्रकाश अंधार दूर
सारत होता.
तो एकेका खोलीत जाऊन फ़ेरी मारून
यायचा. अजून त्याला भूत दिसले
नव्हते. आता त्याची भीती बरीच
कमी झाली. तो शेवटच्या खोलीत
शिरला.लांबच लांब खोली होती. थोड्या-
थॊड्या अंतरावर
लोखंडी गजांच्या अनेक
मोठ्या खिडक्या होत्या. हे कदाचित
गोदाम
असावे, असा त्याने अंदाज
बांधला आणि तो खरादेखील होता. ते
गोदाम होते. चिंचेच्या झाडाखालून
आपल्याला हीच खोली दिसले
हेदेखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफ़ेर
नजर फ़िरवली.
खाली फ़ुटक्या कौलांचा खच होता,
पालापाचोळा, कोळीष्टके होतीच.
तो खिडकीबाहेरून कसे दृश्य दिसते हे
बघायला खिडकीपाशी गेला.चिंचेच्या झाडाखाली त्याला एक
आकृती दिसली. अंधूक प्रकाशात चेहरा नीट
दिसत नसला कपड्यांवरून
आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच
असल्याचे त्याच्या लक्षात
आले. अमोल कधीकधी शाळा सुटल्यावरदेखील
चिंचेच्याझाडाखाली बसून चिंतन का मनन,
अमोलच्याच भाषेत, "
विचार करतो विश्वाचा" वगैरे अलाना-
फलाना करत असतो हे
त्याला माहीत होते.
अचानक पंकजच्या मनात एक विचार आला.
"समजा आपन अमोलले
उद्या सांगितला की कारखान्यात जाऊन
आलो तरी त्याचा विश्वास
बसन्याची शक्यता कमीच राह्यल. आज
तो आपल्या डोळ्यानं पाह्यल तं
त्याचा विश्वास पन बसून जायल.
"
आणि तो खिडकीपाशी जाऊन
अमोलला हातवारे करू लागला.
मोठ्याने हाका मारू लागला. पण अमोलचे
काही लक्ष जाईना.
एव्हाना अंधारू लागले होते. कदाचित ह्यामुळे
असेल, असे वाटून
तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू
लागला. खिडकीतून हात बाहेर
करून आपल्याकडे बोलवू लागला. पण अमोल
खाली मान घालून
कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे.
तो जणू तिथेच
थिजला होता, काहीच प्रतिसाद देत
नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने
तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत
वळला. मग त्याने उग्गाच
खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून
त्या टोकापर्यंत उड्या मारत
धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न
करावा म्हणून
खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्ह्ता.
तो घरी परतला असावा.
इकडे कारखान्यात पंकजची भिड
पुरती चेपली होती.
तो आता कारखान्यात " अगा भूत भाऊ, भूत
काका, भूत मामा,
सामोर ये गा .." असे मोठ्याने ओरडत हिंडत
होता.
तो आता कारखान्यातून बाहेर पडला.त्याचे
लक्ष पुन्हा विहीरीकडे
गेले.
" आता भुताची कहानी खोटी आहे म्हंजे
सापाची पन खोटीच असल..
" त्याने विचार केला.
तो हळूहळु विहीरीकडे जाऊ लागला. पण
त्याच्या डोक्यात
पुन्हा विचार आला,
" अनं सापाची गोष्ट खरी राह्यली तं ? मंग त
मी साप बनून जाईन.
मग आई का म्हनल ? भुताले तं पटवता पन येउन
जायल, पर
सापाचा मानूस कसा बनीन ? "
आणि तो परत विहीपासून दूर झाला.
" कारखान्यात भूत नाही आहे इतका माहीत
झाला तोच बहोत आहे,
आता जास्ती मस्ती नाही करावले पाइजे , "
असा विचार करत
तो कंपाउंडपाशी आला आणि भिंतीवर
चढला.
एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण
तो आता अंधाराला घाबरत
नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर
नजर
फ़िरवली आणि अगदी आनंदाने
खाली उतरला.
घराकडे परत जातांना त्याला खूप हलके वाटत
होते. एक ओझे
उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे
त्याला कळले होते.
उद्या अमोलला हे सारे सांगायचे हे ठरवले. आज
त्याला अतिशय
शांत झोप आली.
दुसर्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा,
पण पंकजला जाग
आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून
उठवले नाही. जेव्हा जाग
आली , तेव्हा सकाळचे १० वाजले होते.
त्याची शाळा सुटली होती.
त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की,
आपण आजच जात
आहोत. म्हणून तुला उठवले नाही. काल अचानक
जाण्याचा दिवस
बदलला. तुझ्या शाळेचे सगळे काम झालेच आहे.
तिने त्याला पटकन
आवरून तयार व्हायला सांगितले.
तो अमोलला भेटू शकत नव्हता.
भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगू
शकत
नव्हता. अमोलने
त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले
आहे हे सांगू शकत
नव्हता. आणि शेवटचे
चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू
शकतनव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती.
" आई, मी शाळेत जाऊन येऊ ५ मिन्टं ? "
त्याने
विचारले.
" अरे , आता कसा जाशील ? वर्ग चालू
असतील
आणि आपली सगळी तयारी झाली आहे.
गाडी बाहेर वाट बघत आहे.
आवर पटकन."
उगाच त्याच्या मनावर मळभ दाटले. गाडीत
बसून जातांना इथली ३
वर्षें डोळ्यांसमोर येऊ लागली;
आणि कारखान्यातले चित्र तर
वारंवार डोळ्यांपुढे यायचे. कालचा दिवस
त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस
होता. मनातल्या मनात
तो म्हणाला,
" अम्या, दोस्ता, तू सही होतास.
आपला आता बिल्कुल विश्वास
बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात
रायतच नाही...... "
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
आज अमोल शाळेत अंमळ लवकरच आला. वर्गात
त्याची नजर
भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन
बसला. पण
त्याची सारखी चुळबुळ सुरु होती.
प्रार्थना संपली, वर्ग सुरु झाले
तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच
होती. पंकज आला नव्हता.
त्याने पंकजच्याच चाळीत
राहणार्या मित्राला विचारले, त्याने
सांगितले की , ते लोक आजच जाणार होते, गेले
असतील.
" पन तो तं उद्या जानार होता ? "
" हव, पन काल रात्री त्याची आई
माझ्या आईले भेटाले
आली होती तं माहीत झाला का ते आजच
चाल्ले म्हनून. "
" हट बे यार... त्याले एक मोठी गोष्ट
सांगावाची होती बे..
कालचा दिवस जबरदस्त होता बे..
पक्या, दोस्ता, तू सही होतास,
आपला आता बिल्कुल विश्वास
बसला आहे...

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...