Adsense

Sunday, August 11, 2019

माणूसकी

🤝🤝😌🤝🤝

मुंबई पुरात अडकली तेव्हा

ना सिद्धिविनायक धावून आला

ना अल्लाचा कुणी बंदा धावून आला

नाशिक पुरात अडकलं तेव्हा

ना वणीची देवी धावून आली

ना शिर्डीच्या साईबाबाने चमत्कार केला

कोल्हापूरची अवस्था बघता

ना महालक्ष्मी धावून आली

ना जोतिबा धावून आला

जिकडं तिकडं माणसाचीच

माणसाला वाचवण्यासाठी धावपळ सुरुये...

जिकडं तिकडं माणसाच्या दुःखावर

माणसंच हळहळ व्यक्त करतांना दिसतायत

कित्येक निर्जीव झेंड्यांनी मान खाली घातलीय

धर्म वाहत चाललेत वळणा-वळणाने समुद्राकडे

जाउद्यात एकदाचे...

आता पुन्हा जातींच्या वस्त्या

निर्माण नको व्हायला

निसर्गाने पुन्हा,

*माणूस होऊन जगण्याची सूचना केलीये*

तिच्याकडे कानाडोळा करण्यात अर्थ नाही...

*फक्त माणुसकी*

🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...