Adsense

Thursday, August 15, 2019

#माणुसकीचे दर्शन............................( नक्की वाचा )



नमस्कार मी अनिकेत वाघमारे एक सुंदर अशी रचना सादर करतो आहे " माणुसकी " अश्या एका अदृश्य विषयावर काही विचार मांडतो आहे.......
माणुसकी.......पण नेमकी माणुसकी म्हणजे काय......?🤔

आपण खरंच माणूस म्हणण्याचा तरी लायकीचे आहोत का....?

माणसाचा मुखवटा घातलेली करोडो व्यक्तिमत्त्व आहेत
काही आपल्या रोजच्या दिनचर्येत भेट देत असतात मग ते मित्र.नातेवाईक,ओळखी-अनोळखी अश्या अनेक लोकांशी आपला सवांद साधतो.पण कोणी त्याच्या आत धूर्त कोल्हाबा असतो,कोणी विषारी साप असतो.खर तर आज धावपळीच्या युगात आपण साधी माणसं तरी उरलो आहोत की नाही याची शंका मला असते.रस्त्यावर अपघात घडलेला दिसला तरी आपण न थांबता, त्याच्या मदतीला न जाता ऑफीसला कामाला उशीर होईल म्हणून पुढं निघून जातो.कित्येक लोकांचे जीव जातात योग्य वेळी मदद न मिळाल्या मुळे आता अस दिसून येते की तो मदतीचा हात पॅन्टचा खिशात जातो फोटो काढायला ज्याची-त्याची लगबग असते सर्व फोटो टीपायची................याला म्हणतात का माणुसकी .....?

सिग्नल लागल्यावर भिकारी मुलं दिसली तर त्यांना एखादा रुपया देतो.शिवाय तो मुलगा,लंगडा किंवा आंधळा खरा खुरा आहेका याचा आधी शोध घेतो,शंका घेतो.मंदिरात पैसे देण्यासाठी आपल्यात कुठलीच शंका नसते.मी दान करतो आहे म्हणजे मी माणुसकी दर्शवतो अशी खोटी समज आपल्यात रुजली आहे.सर्व काही देखावा ठरतो आहे. दहीहंडी,होळी गणपती अश्या अनेक कामात वर्गणी देणे आणि विविध मनोंरजन कार्यक्रम करुण लोक गोळा करने खुप प्रसिद्धी आणि व्वावाही मिळवणे यात आपल्याला माणुसकी वाटते.बाघा आता ज्या पोराने कधी आईबापाला घोटभर पाणी नसेल दिले तो पोरगं नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं खुप फोटो सोशल साइट वर मिरवतो.आणि स्टेटस टाकतो
" i love and believe in humanity "

अशी उरलेली आहे आपली माणुसकी...............!

पण,
अडाण्यांना शिकवणं, वृद्धांना वेळ देने,अनाथ आश्रमात भेटदेणे,मनोरंजनाचे पैसे वाचवून ते अनाथ,गरीब मुलांना प्रत्यक्ष देणं हे आपण विचारच करु शकत नाही.कधी कधी वाटत माणुसकी म्हणजे देखावा...! खरंच माणुसकी हरवतेय याचा विचार मनापासुन केला पाहिजे.म्हणुन नुसता विचारच नाही तर त्याच प्रत्यक्ष अनुकरणही झाले पाहिजे...

माझ्यामते आता रस्ते डांबरी झाली आणि माणसंही डांबरट झाली म्हटल तर हरकत नाही कारण,रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीला दवाख्यान्यात नेऊन टाकण्याचं सौजन्य कुणी दाखवत नाही,हवं तर फोटो काढतील,आपल्या मित्रांना share करतील पण मदतीचा हात कुनलाच नाही.प्रत्येकाला भीती आप-आपल्या परिवाराची,आपल्या संपत्तीची मात्र देश खड्यात गेला तरी आम्हाला फरक पडत नाही.
मग बघा स्वार्थच सर्वाना असत तर मनुसकीचे दर्शन कुठे होणार...?
मेणबत्त्या जाळल्या म्हणून आपन माणुसकी दर्शवतो ही खोटी समज आहे खर तर माणुसकीचा हात पुढे केला तर सर्व चित्र सुधारु शकते...!

पण कोण माणुसकीणे वागनार .........!

बदल हवा,बदल हवा अश्या बोम्बा मारत बसतो पण स्वतः आपन कधी बदलणार ...? याचा विचार कोणीच करत नाही

माझे विचार माणुसकी म्हणजे काय ......?
जे जे मला हवे ते ते दुसऱ्याला देण म्हणजे माणुसकी गाडगे बाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिल,तहानलेल्यांना पाणी पाजल,रोग्यांची सेवा केली,धर्मशाळा बांधल्या सावित्रीबाई फुले,महात्मा फुलेंनी शाळा काढली हे खरे मानवता धर्माचे प्रतीक आहेत.आपणही आपल्या आयुष्यात दुसऱ्यांच्या सुखासाठी,आनंदासाठी,हितासाठी काही करू शकत असू तर आपणही मानवता धर्माच प्रतीक बनू शकतो अस मला वाटत.

आता बघा

स्वतःला एक प्रश्न करा मी माणुसकी म्हणुनन आजवर काय केले......

बरेच लोकांच उत्तर हे असेल 👇🏼👇🏼👇🏼👇🏼

भिकाऱ्यांना आणि दानपेटीत दान

इतर काही अजुन आठवत का आपल्याला...?

बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती सोडल्या तर बऱ्याच लोकांकडे या प्रश्नाचे उत्तर देखील नसेल कारण आपल्याला माणुसकी पेक्षा स्वार्थ प्रिय आणि श्रेष्ठ वाटत.....

माझ्यामते माणुसकी म्हणजे ....
माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.खर तर माणुसकीने जगन म्हणजे ही वेगळीच कला आहे व त्याचा आनंद एक वेगळा अनुभव देतो.अनुभव #माणुसकीचा #माणुस म्हणून जगण्याचा.
माझा रोज असा काही प्रयत्न असतो..
शेवटी...
मित्रांनो या माणुसकीच्या बाजारात माझ्यातला एक रचनाकार  “खरा माणूस’ शोधतो आहे. पण तो शोध कधीच पूर्ण होईल असं वाटत नाही.......!!

मनात आले ते मी शब्दात मांडले,मनापासून आवडल असेल तर इतरांना पाठवा....

मी चुकीचा असेल तर मूर्ख म्हणून सोडून द्या
मी विद्वान नाही साधा-सरळ एक रचनाकार आहे ......

✍️ ✍️ - अनिकेत वाघमारे ( एक रचनाकार ) नागपुर,

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...