रविवारचा धमाल विनोदी किस्सा.
नवरा बायको मधील संवाद.....
बायको : मग काय ठरवलंस?
नवरा : कसलं काय? काय ठरवायचं होतं?
बायको : तुझं? दिल्ली ला जायचं? बुकिंग वगैरे केलंस कि नाही?
नवरा : मी? आणि दिल्लीला? कशासाठी? मी कधी म्हणालो तसं?
बायको : म्हणायला कशाला हवंय? तू शपथविधीला जाणार नाहीस?
नवरा : कसला शपथविधी ? आणि माझं काय काम तिथे?
बायको : अरे असं काय करतोस? तुला मंत्रीपद नाही मिळणार?
नवरा : आयला? काय येडी बेडी झालीस कि काय? मला कोण मंत्री बनवणार? इथे सोसायटीच्या संचालक निवडणूकीत ऊभं करुन दोनदा पाडलंय लोकांनी. मला दिल्लीला कोण विचारणार?
बायको : असंय होय?
मला वाटलं इतके दिवस what’s appवर तडफडतोयस. . .
वात झाल्यासारखा याला शिव्या घाल,
त्याला उचलून धर,याची वकिली कर,
त्याची फौजदारी कर...
एखाद्या मंत्र्यांच्या वरताण निवडणूक भिनलीय तुझ्या अंगात म्हणून मला वाटलं यावेळी तुलाच मंत्री करायचं कबूल केलंय पक्षाने.....
नवरा : ह्या ह्या . . . काय जोक करतेस. . . . तू पण काय खेचतेस माझी.....
बायको : आता तोंड वेंगाडून हसू नको. तो मोबाइल ठेव हातातला, आणि दळण ठेवलंय ते घेऊन ये जा. जाताना प्लास्टीकची बाटली घेऊन जा आणि स्कुटीत पेट्रोल संपलंय ते आण.
काम ना धाम. . . मतांवर ठाम. . .
ऊठ आता.....
😃😀😅😄😂😉
😃😀😅😄😂😉
No comments:
Post a Comment