Adsense

Saturday, January 25, 2020

मुंबईतील ट्रेन मधील लोकांच्या सहकार्याचा मजेदार किस्सा

अजिबात काटकसर करू नका, हसा लेको.. 
आवडला तर मोठ्या मनाने दाद द्या.
------------

मुंबईतील ट्रेन मधील लोकांच्या सहकार्याचा मजेदार किस्सा

काही दिवसांपूर्वी दादरला ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन मधे चढलो. माझ्या मागोमाग एक तरुणही चढला. तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला "मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय." लोकांनी सांगितलं की "ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही". बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की "घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतार व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस". झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला. तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं, "तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."

😜😜😜😜😜

😂😆😂😆😂😆😂

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...