Adsense

Saturday, January 25, 2020

मोहन Marathi Jock

😀😀😀

मोहन सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी बसमध्ये चढले...तर

 कंडक्टरने हसत सुहास्य वदनाने त्यांना विचारले 'साहेब, काल राञी तुम्ही ठिक-ठाक घरी पोहचले होते ना ?

मोहन (आश्चर्याने) का? काल राञी मला काय झाले होते ...?

कंडक्टर: एकदम टुन्न होते तुम्ही.

मोहन (रागाने): तुम्ही हे असे कसे बोलु शकता? मी तर तुमच्याशी बोललोही नव्हतो...

कंडक्टर: कसं आहे साहेब, काल राञी जेव्हा तुम्ही बसमध्ये बसला होता, तेव्हा एक मॅडम बसमध्ये चढल्या होत्या आणि तुम्ही उठुन आपली सिट त्यांना ऑफर केली होती...

मोहन: मग त्याच्यात विशेष काय झालं, हा आदर प्रत्येकाने करायलाच हवा, ह्यात मी नशेत असण्याचा काय संबंध?

 महिलेला सिट ऑफर करणं गुन्हा आहे का?

कंडक्टर : साहेब गुन्हा तर नक्कीच नाही..

.
पण त्यावेळी बस पूर्ण रिकामी होती..
.
.

 आणि पुढचा सगळा प्रवास तुम्ही उभे राहूनच केलात.

😜😜😜😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...