एक व्यक्ती आपल्या घरी जात असताना अचानक त्याची गाडी बंद पडली
.
एकतर खूप रात्र झाली होती आणि त्यात गाडी खराब
आजूबाजूलाही कोणीच नव्हतं...
मोबाईलला ही नेटवर्क नव्हता...
त्याने गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावली आणि लिफ्ट साठी वाट बघू लागला
.
बऱ्याच वेळाने एक गाडी आली,हळूहळू गाडी त्याच्याजवळ आली व थांबली लगेच तो व्यक्ती त्या गाडीत बसला.
आणि बघतो तर गाडीत कोणीच नव्हते
त्या व्यक्तीचा घसा कोरडा पडला
काय करावे हे त्याला सुचेना
पण गाडी तर चालली होती हळूहळू...
पुढे एक वळण आल्यावर खिडकीवर कोणाचा तरी हात दिसला
तो अजून जास्तच घाबरला आता करावे तरी काय?
तोपर्यंत पुढे एक पेट्रोल पंप आला, गाडी हळूहळू पंपावर येऊन थांबली आणि त्या व्यक्तीच्या जीवात जीव आला
पटकन तो व्यक्ती गाडीतून उतरला आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर जाऊन उभा राहून गाडीकडे बघू लागला तर एक माणूस येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसायला चालला
.
.
तर ती व्यक्ती त्या माणसाला म्हणाली, गाडीत बसू नका या गाडीत भूत आहे.मी आत्ताच उतरलो या गाडीतून
.
.तर तो माणूस, आयला तू कधी बसलास रे गाडीत.
तरीच म्हंटल गाडी एवढी जड का झाली, पेट्रोल संपलं म्हणून 5 किलोमीटर ढकलत आलोय गाडी
😜😜😝😝
No comments:
Post a Comment