Adsense

Sunday, January 26, 2020

Letter to Father

प्रिय बाबा,  
         मी घर सोडून जातो आहे.मला माफ करा.खूप दिवस सांगायचं होतं,पण धाडस होय नव्हतं.माझं नेहावर(बी विंगमधल्या पेंडसे काकांची कन्या) प्रेम आहे.पण आपल्या कुटुंबातली दुश्मनी बघता,तुम्ही आमच्या नात्याला मान्यता देणार नाही,कारण ती ड्रिकींग-स्मोकिंग करते.पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल,ड्रिंकर लोक परखड बोलले तरी कधी खोटं बोलत नाहीत. 
     मी आज सकाळी सकाळीच आईला-तुम्हाला न सांगता बाहेर पडलो,कारण मला तिच्या जामिनाची सोय करायची होती.काल राञी ती तिच्या काही मिञांसोबत अंमली पदार्थ सेवन करताना पकडली गेली होती.आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने मला फोन केला.हे माझ्यावरचं तिचं प्रेमच नाही का? पण ती तुम्हाला आणि आईला मात्र शिव्या देते,तिला सासू-सासरे पसंत नाहीत. म्हणून, आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी आम्ही वेगळं राहणं योग्य वाटलं.
    हां,आता मला नोकरी नाही,पण त्याचीही व्यवस्था तिने केली आहे.तिने मला पाकीटमारी शिकवली आहे.शिवाय तिच्या मिञांचा स्वतःचा असा ड्रग सप्लायचा बिझनेस आहे,तोही शिकून घेईन.
    आपली लाईफ तर सेट आहे बाबा,बस्स,तुमचा आशीर्वाद हवाय!
                      -तुमचा लाडका मुलगा रोहन
P.T.O.

========================
   आधीच हे सगळं अनपेक्षित भयंकर वाचून,डोकं कामातून जाणंच तेवढं बाकी राहिलेल्या परमपुज्यांनी,थरथरत्या हातांनी पञ उलटून मागे पाहिलं,तर लिहीलं होतं.......

====
   चिंता करू नका.समोरच्या विकीकडे मॅच बघतो आहे.मला फक्त एवढंच जाणवून द्यायचं होतं की माझ्या निकालापेक्षाही या जगात बरचं काही वाईट होऊ शकतं.  
   म्हणून, जे आहे ते थोडं जरी असलं,तरी त्यावर समाधान माना.
   टेबलावर परीक्षेचा रिझल्ट ठेवलाय. सही करा काॅलेजात जमा करायचायं........

😂😂😜😜😜😜😛😚

No comments:

Post a Comment

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...