सोनू च्या घरी गणपती आला. त्याने मनोभावे पूजा केली, मित्रांना, नातेवाईकांना घरी बोलावले, प्रसाद दिला. सण चांगला साजरा केला.
त्यानंतर तो लालबाग च्या राजाचे दर्शन घ्यायला गेला... १०तास रांगेत थांबला ... धक्के खात कसे तरी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.. थकून भागून घरी आला ...
तेव्हा घरचा गणपती त्याला म्हणाला ..
" सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का। ?"
🤣🤩🤣🤩🤣🤩🤣🤩
दोन सासवांचा संवाद.
😃😆😆
१ ली सासु :- माझी सुन सारखी व्हॉट्सअप डीपी बदलते ग.
नाश्त्यानंतर एक.
लंचनंतर एक.
डिनर नंतर एक.
सारखं आपलं मॉडेलींग .
छे!!!!
मला अजिबात आवडत नाही.आमच्यावेळी नव्हतं हो असं .
२ री सासु :-
अग पण तू कशाला
नाश्त्यानंतर , लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ?
जपाची माळ ओढत बस की मुकाट !!
😬😝😜😂😁
मांजर आडवे गेल्यास घाबरु नये ,
🐈
मांजराला आडवं (horizontal)जाण्यावाचुन पर्याय नाही ,
🐱
जर ते उभं (Vertical)गेलं तर सरळ आकाशात निघुन जाईल .
🚀
No comments:
Post a Comment