गटारीतले #बापाचे ते सुगंधी हात
Sunita Choudhari
"आरं ए शिरप्या कीती म्हून काम करनारस रं ! लय कमाई करतोय ल्यका तू " म्हणत शिरप्याचे दोस्त मंडळी त्याची टर उडवत होते.
आज शिरप्या सकाळपासूनच कामाला लागला होता. आणि सकाळपासूनच आज त्याच्या शेजारच्या एका गावातल्या तुंबलेल्या गटारांची सफाई तो करत होता. आज त्याला दुपारच्या जेवणाची सुध्दा शुध्द नव्हती त्याला फक्त आज रोजच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे होते. संध्याकाळचे सहा वाजले तशी त्याला घरी जायची गडबड झाली. कामं पटपटा आवरून तो हातपाय धुवुन घराकडे निघाले.
आज त्याची सायकल जोराने हाकत तो वा-याचा वेग धरायचा प्रयत्न करत होता. तासाभरातच तो स्वतः च्या गावच्या रस्त्यावर पोचला आणि तिथल्या एका कापडाच्या दुकानातून त्याने स्वस्तातला एक नवीन शर्ट घेऊन जवळच असलेल्या हुसैन चाचाच्या घरी अत्तर घ्यायला पोचला. त्याने चाचाला बाहेरून आवाज दिला.
"हुसैन चाचा हाय का वं घरामंदी"? ...आवाज ऎकत चाचा बाहेर आले .
तसं शिरप्या त्यांना म्हणाला. "चाचा त्ये एक झाक वालं अत्तर देता का मला उद्या ल्येकाच्या साळंला जायचय. असाच गेलो तर अंगाला गटारीचं घाण वास येईल, अन् माझ्या पोराला समदी हसतील.....कसला घान हाय ह्याचा बापूस म्हून"
चाचा खुप चांगले होते आणि शिरप्याचा चांगला स्वभाव आणि पोरासाठीचं प्रेमही त्यांना चांगलच माहीत होतं.
अरे देता रे बाबा चांगलं वालं अत्तर देतो तुला म्हणत, शिरप्याकडून कमीच पैसे घेत चाचांनी त्याला एक चांगलं अत्तर दिलं.
शिरप्या सगळं घेऊन घरी पोचला तोच त्याचा बारा वर्षाचा पोरगा चंदू ऊर्फ चंद्रकांत त्याची वाट बघत दारातच उभा होता. बापाला पहात त्याने त्याला घट्ट मिठी मारली. आणि दोघं त्यांच्या झोपडीवजा घरात आले.
आजीची तब्येत बरी नाही म्हणून गेले महिनाभर त्याची आई माहेरी होती. सगळं काम हे बाप - लेक च करत होते. चंदूने भाजी बनवून नकाशासारख्या भाक-या थापल्या होत्या आणि हसत खेळत दोघं बाप लेक ते खात होते. जेवल्यानंतर शिरप्याने नविन शर्ट आणि अत्तराची बाटली चंदू समोर ठेवली . अन् आपल्या बापाने आपल्या शाळेत यायची सगळी तयारी केली आहे याच्या आनंदाने तो आपल्या बापाला परत बिलगला.
चंदू हा त्या गावातला सगळ्यात हुशार आणि चांगला मुलगा होता. शाळेत काहीही कार्यक्रम असला की चंदूचं भाषण व्हायचच हा जणू नियमच बनला होता. पण ह्या वेळेस त्यांच्या शाळेला 'आदर्श शाळा' म्हणून पुरस्कार मिळणार होता आणि सोबतच 'आदर्श विद्यार्थी' म्हणून चंदूलाही पुरस्कार मिळणार होता. म्हणूनच मोठमोठाले लोक तिथे येणार होते.
चंदूच्या वडिलांनाही शाळेत बोलवलं होतं. याआधी आपल्या पोराला कोणी नाव ठेऊ नये म्हणून शिरप्या चंदूच्या शाळेत जाणं टाळायचा पण चंदू ला मात्र आपल्या ह्या गटारी साफ करणाऱ्या बापाचा सार्थ अभिमान होता. आपला बाप आपल्या चांगल्या भविष्यासाठी स्वतः ला कसं तिळतिळ वेचतो ह्याचं भान त्याला होतं म्हणूनच आपल्या बापालाही आपल्याला पुरस्कार मिळतानाचा आनंद मिळावा म्हणून त्याने शिरप्याला ह्यावेळी शपथ घालून शाळेत येण्याचं कबूल करून घेतलं होतं.
सकाळ झाली आणि चंदू शाळेला निघाला. आणि त्याने शिरप्याला आठवण करुन दिली की,
"अाबा बरोब्बर अकरा वाजता शाळेला या हा मी वाट बघतोय तुमची"..... म्हणत तो शाळेला गेला. शिरप्या घरातली कामं आवरून आता शाळेला जायच्या तयारीला लागला आणि त्याने नविन शर्ट घालायला घेतला तेवढ्यात सरपंचाचा माणूस दारावर आला .
"आरं ए शिरप्या चल ! लय मोठ्ठा पराबलम झालाय आपल्या साळंचं गटार तुंबलय अन् बाकी साफ करनारं बी कोन घावंना झालय ,मोठ्ठी लोकं येनार हायेत म्हंनं .....अन् तुझा चंद्या बी हाय की रं त्याच साळंला त्येच तुंबलेलं गटार बरं दिसनार हाय का चल तू बिगी बिगी".
Save 45% on select product(s) with promo code 45I64NRT on Amazon.com
मालक आज तेवढं राहू द्या मला बी साळंला जायचय.....पोराचं भासण का काय असतं त्ये हाय.....तिथंच मी गटार साफ करताना दिसलो की पोराची सान जाईल की ओ माझ्या.
सरपंचाच्या माणसाने शिरप्याला एक सणसणीत शीवी हासडली अन् त्याला जबरदस्तीने काम करायला शाळेत आणलं.
शिरप्या शक्य तेवढं चेहरा लपवत काम करू लागला. अकरा वाजून गेले अन् मोठ्ठे पाहुणे आले. शिरप्या कामातच होता अन् लाऊडस्पीकरवरून एक खणखणीत आवाज सुरू झाला.
नमस्कार, माझे नाव आहे चंद्रकांत शिरपाल माने .......................पोराच्या आवाजाने गटारीत उतरलेल्या शिरप्याला रडू आलं , पण तो पटापट काम उरकत होता .
चंदू चं भाषण झालं, शाळेला पण पुरस्कार देऊन झाला आता आदर्श विद्यार्थी म्हणून चंदूला स्टेजवर बोलावलं गेलं. अाबा अजून कसा आला नाही म्हणत त्याची नजर बापासाठी लांब लांब धापा टाकत होती. चंदू स्टेजवर आला, निराश मनाने त्याने पुरस्कार घेतला आणि तेवढयात चोरूनच झपाझप जाणाऱ्या बापाला त्याने पाहिलं. त्याच्या मनात चर्र चर्र झालं त्याला समजायला वेळ नाही लागला की आपला बाप आपल्या शाळेचं तुंबलेलं गटार साफ करत होता म्हणून त्याचे अकरा वाजलेच नाही ......त्याचं मन भरून आ

No comments:
Post a Comment